"भारतामध्ये १९९१-२००० च्या दशकामध्ये अभूतपूर्व अशा आर्थिक आणि औद्योगिक सुधारणा धोरणांची आखणी करण्यात आली. परिणामी, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये देशातील आर्थिक विकासाला गती प्राप्त झाली. त्यामुळे देशातील गुंतवणुकीत वाढ झाली. औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली. रोजगारामध्ये वाढ झाली. त्यामुळे देशातील नागरीकरणामध्ये खूप मोठ्याप्रमाणात वाढ झाली. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये आपल्या देशातील एकूण लोकसंख्येमध्ये वाढ झाली असली तरी लोकसंख्येच्या वृद्धी दरामध्ये मात्र २००१ पासून घट होऊ लागली आहे. अर्थव्यवस्थेच्या स्वरूपातही बदल घडून येऊ लागले आहेत. कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून सेवा प्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल झाली आहे. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेने जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.
आर्थिक सुधारणांच्या या प्रक्रियेत आर्थिक क्षेत्रामध्ये जे परिवर्तन घडून येत आहे. त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, कृषी विकास, औद्योगिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, भांडवली बाजार, श्रम बाजार अशा विविध महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर विकासाच्या प्रक्रियेतील नवसंकल्पनांचासुद्धा प्रस्तुत पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तक हे महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा विद्यार्थी, समाजातील विविध क्षेत्रातील अभ्यासक व वाचकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरणारे आहे असा विश्वास आहे.
Explore India’s economic development after 1991, covering reforms, national income, population, poverty, agriculture, industry, infrastructure and markets.
"

