‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.