आज भारतीय लोकशाही एका स्थित्यंतरातून मार्गक्रमण करीत असताना तिच्या यशापयशाचा व तिच्यासमोरील आव्हानांचा साक्षेपाने धांडोळा घेऊन तिच्या निकोपतेसाठी उपाययोजना सुचविणे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने राज्यशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रांत सहभागी झालेल्या संशोधकांचे अभ्यासपूर्ण लेख या संदर्भग्रंथात समाविष्ट केले आहेत. यामुळे हा संदर्भग्रंथ अभिजात लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी बहुमोल मार्गदर्शक ठरेल. राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.