भारतीय समाज आणि संस्कृती या ग्रंथात भारतीय समाजातील विविधता लक्षात घेऊन अनेक मुलभूत मुद्यांचा समावेश केला आहे. या ग्रंथात भारतीय समाजव्यवस्था व त्यातील विविध मुलभूत तत्वे, भारतीय संस्कृती, चार आश्रमव्यवस्था, पुरूषार्थ, कर्म सिद्धांत, जातीय संरचना व जातीच्या उत्पतीचे सिद्धांत, विवाहसंस्था व कुटुंबसंस्था या विश्लेषनाबरोबर भारतीय स्त्रिया आणि भारतीय सामाजिक जीवनावर इस्लाम आणि पाश्चात्य संस्कृतीचा पडलेल्या प्रभावाची विश्लेषनात्मक मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथात भारतीय समाजाचे सर्वागिंण दर्शन होईल. भारतीय समाजातील अनेक मुद्याचा समावेश करून विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक अशा सर्वाना उपयोगी सिद्ध होणारा हा महत्वपूर्ण ग्रंथ होय. समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.