भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
  • Load image into Gallery viewer, भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
  • Load image into Gallery viewer, भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
  • Load image into Gallery viewer, भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत
  • Load image into Gallery viewer, भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत

भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत

Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Regular price
Rs. 395.00
Sold out
Unit price
per 

‘समाजशास्त्र’ (Sociology) हे नव्याने उदयास आलेले ‘शास्त्र’ (Science) होय. या शास्त्राच्या विकासाकरिता अनेकानी केलेले कार्य खूप मोलाचे आहे. या संदर्भात विदेशातील संशोधक व शास्त्रज्ञानी केलेल्या कार्याप्रमाणे भारतीय विचारवंत व शास्त्रज्ञानी केलेले कार्यही उच्च दर्जाचे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्य केलेल्या देशभरातील अनेक विचारवंतांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात केला आहे. त्या सर्व विचारवंतांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. समाजव्यवस्थेची उन्नती व विकास करण्यासाठी त्यांचे विचार वस्तुनिष्ठ व वैज्ञानिक दृष्टया उपयोगी सिद्ध झालेले आहे. त्या महान भारतीय विचारवंतांचा वैचारिक वारसा समाज उन्नती व विकासाकरिता जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हाच वारसा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ व वैज्ञानिक पद्धतीने मांडण्याचे काम सदर पुस्तकात लेखकांनी केले आहे.
देशातील अनेक विचारवंत, अभ्यासक, संशोधक व शास्त्राज्ञांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामध्ये महात्मा गांधी (१८६९-१९४८), डॉ. बी. आर. आंबेडकर (१८९१-१९५६), डॉ. एस. व्ही. केतकर (१८८४-१९३७), राधाकमल मुखर्जी (१८८९-१९६८), डॉ. एम. एन. राय (१८८७ -१९५४), डॉ. जी. एस. घुर्ये (१८९३-१९८३), डॉ. एम. एन. श्रीनिवास (१८९६-१९९९), डॉ. ए. आर. देसाई (१९१५-१९९४), डॉ. एस. सी. दुबे (१९२२-१९९६) अशा आघाडीच्या एकूण नऊ भारतीय विचारवंताचा व शास्त्रज्ञाचा समावेश सदर पुस्तकात केलेला आहे.
या ग्रंथातील समाविष्ट विचारवंतांचे मौलिक विचार मांडताना त्यांनी व्यक्त केलेली मते, विचार, संज्ञा, संकल्पना व सिद्धांत महत्त्वाचे ठरतात. त्यांचे विचार, मते, दृष्टिकोन व त्यांचे सिद्धांत अगदी सोप्या व सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
Marathi Language book on Modern Indian Sociological Thinkers by Authors Dr. B M Karhade and Dr Kishor Raut.