स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. ते संपूर्णपणे निर्मूलन होईल, थांबेल अशी अशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. शासनातर्फे वेळोवेळी होणारे प्रतिबंधक कायदे, जनसामान्य स्त्री पुरूषांचे सातत्याने प्रबोधन, प्रसारमाध्यमांचा दबाव व त्यांच्यातर्फे होणारे जनजागरण व वातावरण निर्मिती ह्या सर्वांचा सामूहिक परिणाम म्हणजे त्या प्रमाणात होणारी घट. ह्या सर्व अत्याचार, अन्यायापासून मुक्त असा समाज निर्माण करणे ही दुरवरचे उद्दिष्ट आहे. अंतिम ध्येय आहे. त्यासाठीच शासन, जनसामान्य , प्रसारमाध्यमे , स्वयंसेवी संस्था ह्यांची बांधिलकी निर्माण होणे अगत्याचे आहे. भारतीय राज्यघटणेची उद्दिष्टे पायाभूत आहेत. समता, स्वातंत्र्य , बंधुता ह्या मूल्यांसाठीच भारतीय महिला विकासाची वाटचाल चालू आहे.
महिल विकासाच्या आगामी वाटचालीत परूषवर्गाच्या समंजसतेची, उदार मनोवृत्तीच्या नितांत गरज आहे. स्त्री मुक्तीची कार्यप्रेरणा ही पुरुषविरोधी, पुरुषाला शत्रू मानणारे असणार नाही कारण महिला मुक्तीबरोबरच पुरुषमुक्तीही होणार आहे . कौटुंबिक जीवन सुखी समाधानी, सुसंस्कृत होण्यासाठी पुरुष वर्गात सुयोग्य बदल, परिवर्तन वेगाने व्हायला हवा. पुरुषसत्ता , स्वामित्व भावना अधिकाधिक मवाळ, सहयोगपूरक व्हायला हवी. आगामी काळातील महिल विकासाची वाटचाल प्रामुख्याने पुरुषवर्गाच्या वृत्ती-प्रवृत्ती परिवर्तनावर अवलंबून आहे.
अशा महिला विकासातील सर्व महत्वाच्या टप्प्यांचे दर्शन या पुस्तकातून होते.