जीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
जीआयएस हे तंत्रज्ञान संगणक युगातले व संगणकावरच आधारित असे तंत्र आहे. त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही भाषा व अभिक्षेत्रीय (Spatial) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे हे तंत्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून साध्या सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.
जीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यासाठी हे नंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे.