सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भूगोल शास्त्रातील संशोधन प्रक्रियेस फार मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. भूमाहितीशास्त्र (Geo informatics) व उपग्रहीय सर्वेक्षण (Satellite Survey) यात भूगोलशास्त्रातील संशोधनास महत्त्वाचे स्थान आहे. भूगोलातील आधुनिक अभ्यासात भूगोल तज्ज्ञांनी स्वतःची अशी एक संशोधन पद्धती तयार करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. यात मुख्य भर हा क्षेत्र अभ्यास (Field work) निरीक्षणे, मोजमापे, भूपृष्ठ सर्वेक्षण, हवाई छायाचित्रांचे व उपग्रह प्रतिमांचे वाचन-वर्णन-विश्लेषण, जी.आय.एस. चा व जी. पी. एस. चा वापर यावर आहे. यांच्या जोडीला सांख्यिकी विश्लेषण पद्धतींचा वापरही वाढतो आहे.
भूगोल शास्त्रातील माहितीचे वेगळे स्वरूप पाहता अशा बहुविध संशोधन तंत्राची गरज यापुढेही विश्लेषकाला व संशोधकाला भासणार आहे.
या मूलभूत तंत्रांची माहिती देण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तसेच एम. फिल., पीएच.डी साठी संशोधन करणार्या सर्वच अभ्यासकांना या तंत्रांची नेमकी ओळख होईल, अशा पद्धतीने पुस्तकाची रचना केलेली आहे.
आहे.