एम. फिल.ची डिग्री मिळाल्यावर कुठेतरी पटकन नोकरी मिळेल आणि आयुष्याला निश्चित दिशा मिळेल अशी स्वप्नं उराशी बाळगून, विद्यापीठात एम. फिल. साठी त्यानं नाव नोदवलं, आणि त्यानंतर सुरू झाली एक न संपणार्या असह्य घटनांची मालिका.....
विद्यापीठातल्या विद्वानांचे मान-अपमान, मानभावीपणा, वैयक्तिक हेवेदावे, विद्यार्थ्याला वेठीला धरून सहकार्यांचे काटे काढण्याचे उद्योग आणि विद्यार्थ्यांची उमेद नष्ट करण्यासाठी सुरू झाले हीन, राजकारणी उपद्व्याप.....
डिग्री मिळवण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणार्या, सच्च्या आणि मेहनती विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात जखडून टाकणार्या विद्वानांच्या षड्यंत्राची आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू पाहणार्या जिद्दी विद्यार्थ्यांची ही कथा...