प्रा. सतीश बहादूर यांनी भारतात चित्रपटशिक्षणाचा पाया घातला, आपली स्वतंत्र अभ्यासपद्धती व चित्रपट-अध्यापनाची शैली विकसित केली आणि अनेक पिढ्यांचे चित्रपट-शिक्षण केले. त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या डॉ. श्यामला वनारसे आज घडीला ‘बहादूर-परंपरे’तल्या एकमेव बौद्धिक वारसदार आहेत. श्यामलाताईंनी या पुस्तकात १९४० ते १९६० या कालखंडातल ‘अभिजात’ म्हणून गणले जाणाऱ्या १२ चित्रपटसंहितांचे विश्लेषण केले आहे. यात अभ्यासाची शिस्त, तात्त्विक मर्मदृष्टी आणि नीर-क्षीर विवेकाने केलेली चिकित्सा पाहायला मिळते. चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे.