कोरलाइन जेव्हा तो दरवाजा ओलांडून जाते, तेव्हा पलीकडे अगदी तिच्या घरासारखंच हुबेहूब (त्याहून जरा मजेदारच) घर तिला सापडतं.
पण तिकडे तिचे दुसरे आईबाबा असतात, ज्यांना त्यांची छोटी मुलगी म्हणून तिला कायमचंच आपल्याकडे ठेवून घ्यायचं होतं आणि तिथून कधीच जाऊन द्यायचं नव्हतं.
स्वत:ची सुटका करून घेऊन परत आपल्या नेहमीच्या घरी जाण्यासाठी आता कोरलाइनला आपली सगळी बुद्धी आणि धैर्य पणाला लावायचं आहे.