देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक | Temple Tiger | जिम कॉर्बेट | Jim Corbett
देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक | Temple Tiger | जिम कॉर्बेट | Jim Corbett
  • Load image into Gallery viewer, देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक | Temple Tiger | जिम कॉर्बेट | Jim Corbett
  • Load image into Gallery viewer, देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक | Temple Tiger | जिम कॉर्बेट | Jim Corbett

देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक | Temple Tiger | जिम कॉर्बेट | Jim Corbett

Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Sold out
Unit price
per 

"“नरभक्षक वाघाला मारण्याचं काम मनाला अतिशय समाधान देतं, यात शंकाच नाही. ‘जे काम कुणीतरी करणं अत्यावश्यक होतं आणि आपण ते केलं’ याचं ते समाधान असतं. आपण आपल्या बलाढ्य शत्रूला त्याच्याच परिसरात जाऊन मात दिल्याचं समाधान असतं; आणि या सगळ्याच्या पलीकडे, पुतळीसारख्या धाडसी मुलीला वावरण्यासाठी पृथ्वीवरचा लहानसा का होईना, एक कोपरा सुरक्षित केल्याचं समाधान असतं.”
नरभक्षक वाघांची प्रचंड दहशत बसलेल्या, दुर्गम म्हणाव्या अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॉर्बेट यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींमागची त्यांची ही प्रामाणिक भावना आहे. साहजिकच, या सगळ्या शिकारकथा थरारकच आहेत. मात्र वाघाची शिकार करणार्या या माणसाची माणसाइतकीच वाघाबाबतची संवेदनशीलता अनेकदा रोमांचित करते आणि कॉर्बेट यांचं वेगळेपणदेखील अधोरेखित करते.
म्हणूनच ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलाचं जिवंतपण, सळसळतेपण आणि रांगडा पण नितळ कारभार हा माणूस ज्या तरलेतेने टिपतो, त्यातून ‘शिकारी’ या काहीशा आक्रमक चौकटीच्या कितीतरी योजनं तो पुढे जातो आणि माणसाच्या ‘विकसित’ म्हणवल्या जाणार्या मेंदूमुळे निर्माण झालेल्या अनेक वर्तन विसंगती, त्याच्या मनातल्या सूक्ष्मात रुतून बसलेलं मतलबी क्रौय यांना सहज, नर्मविनोदीपणे पृष्ठभागावर आणतो.
त्यामुळेच ‘थरारक’ म्हणून या कथा आनंद देतातच, पण त्याच वेळी कॉर्बेटबरोबर त्या आपल्यालाही खोल जंगलात उतरायला भाग पाडतात आणि त्याहूनही पुढे जात ‘माणूस’ नावाच्या रसायनाबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतात."