गेली चार दशकं अफगाणिस्तान पूर्णपणे अस्थिर आहे. अफगाणिस्तानातील समाजाची मानसिकता, राष्ट्र या संकल्पनेचा अभाव, टोळीवादी निष्ठा या पैलूंबरोबरच अफगाणिस्तानच्या शेजारील देश आणि विश्व समुदायातील राष्ट्रं यांच्या भूराजनीतिक खेळीत अफगाणिस्तानचे सामाजिक, आर्थिक, राजकीय अपयश सामावलेले आहे. शस्त्रास्त्रांची तस्करी, मादक पदार्थांची पैदास, आतंकवादी गटांच्या राष्ट्रविरोधी कारवाया आणि त्यांना असलेली इतर देशांची फूस या सर्व गोष्टींमुळे अफगाणिस्तानात वणवे पेटले आहेत. त्या वणव्यांच्या आगीत समाज होरपळत आहे. दिशाहीन झाला आहे. अफगाणिस्तान हे आज एक अपयशी राष्ट्र म्हणून ओळखले जाते.
या पुस्तकात अफगाणिस्तानच्या अपयशाच्या अनेक पैलूंचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अफगाणिस्तानच्या आजच्या परिस्थितीचा आढावा आणि पुढील शक्याशक्यतेची मीमांसा या पुस्तकांत केली आहे. अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक पैलूंचं आणि त्याचबरोबर त्याच्या अपयशाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण ह्या पुस्तकात केलं आहे. रशियन फौजा बाहेर पडल्यानंतर आणि तालिबान व अल्-कायदा या गटांच्या विरोधात अमेरिकेने केलेल्या मोहिमेनंतर अफगाणिस्तानची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय गटांनी कोणकोणते प्रयत्न केले; त्या प्रयत्नांमध्ये कोणत्या त्रुटी राहून गेल्या आणि त्यांचा अफगाणिस्तानवर काय परिणाम झाला, अशा सर्व घटकांवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण आणि त्यांची तालिबान संघटनेला असलेली साथ आणि त्याचे भूराजकीय परिणाम यावरही पुस्तकात चर्चा केली आहे.
आता परस्परपूरक सुरक्षाव्यवस्था राबवण्यापेक्षा एकमेकांच्या आधाराने जगायचं कसं, ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही लेखकाने सूचित केलं आहे.