
English - Marathi Dictionary
राज्यशास्त्राच्या विविध शाखांमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंध, सामरिकशास्त्रामध्ये येणार्या विविध प्रकारच्या संज्ञा, सिद्धान्त, करार सदर कोशामध्ये विशद केलेले आहेत. तसेच जागतिकीकरणाच्या प्रवाहातील नव्या संकल्पनांच्या स्पष्टीकरणात्मक माहितीचाही अंतर्भाव यात आहे.
हा कोश राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण व सामरिकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांना राज्य व केंद्रस्तरावरील विविध स्पर्धापरीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व्याख्यांसह.
१००० हून अधिक संज्ञांचा तसेच शब्दसमूहांचा समावेश.
संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह.
पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी.
मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्यांना आश्वासक दिलासा.