आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे विविध अभ्यासविषयांच्या माहितीचे वेगवेगळे असंख्य प्रवाह आज निर्माण झाले आहेत. या प्रवाहांमध्येही जी माहिती सर्वांगीण, परिपूर्ण आणि अद्ययावत असेल, तिचे महत्त्व अनन्यसाधारण ठरत आहे. यामुळेच राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र याप्रमाणेच भूगोल पर्यावरणशास्त्राचा हा महत्त्वपूर्ण कोश डायमंडने सिद्ध केला आहे.
या कोशाची वैशिष्ट्ये :
श्र आर्थिक भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, पर्यटन, कृषि भूगोल अशा भूगोलाच्या विविध शाखांबरेबरच जिआयएस, बायोटेक्नॉलॉजी, अशा आधुनिक ज्ञानशाखांचा समावेश.
श्र सुलभरीतीने केलेले विवेचन.
श्र माहितीपूर्ण अशी ३१ परिशिष्टे.
श्र इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी परिभाषा सूची.
श्र इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेल्या अद्ययावत, उत्कृष्ट आकृत्यांचा समावेश.
भूगोल पर्यावरणशास्त्राचा हा कोश भूगोलशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना, अभ्यासूंना, प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.