समृद्ध सांस्कृतिक परंपरा हे भारताचे शक्तिस्थान आहे. आपल्या देशाचा महान, उज्ज्वल आणि तीव्र संघर्षमय इतिहास हा त्याच्या बारकाव्यासह पुढील पिढीला माहीत व्हायला हवा. म्हणूनच या कोशात भारतीय इतिहासातील सिंधू संस्कृती, भगवान बुद्ध, महावीर, चंद्रगुप्त, अशोक ते थेट स्वातंत्र्योत्तर कालखंड एवढ्या विशाल कालपटातील नोंदी आढळतील. महत्त्वाच्या व्यक्ती, घटना, प्रसंग, विविध स्थाने, पुरातत्त्व, उत्खनन, नगरे आणि असे कितीतरी विषय येथे समाविष्ट आहेत. इतिहासातील बहुतेक सर्व विषयांची सारभूत माहिती देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, जिज्ञासू आणि रसिक वाचकांना उपयुक्त ठरेल, असा .... इतिहास माहितीकोश.