सध्याच्या घडीलाही समाजात अनेक समस्या आहेत. ज्या समस्यांचे नेमके स्वरूप काय आहे, त्या सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर काय प्रयत्न केले जात आहेत, त्याला प्रतिसाद कसा मिळतो, अशा अनेक अंगांनी केलेला हा अभ्यास विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय विभाग, समाज कार्यकर्ते, समाजकार्यविषयक अभ्यास करणारे विद्यार्थी यांना नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास वाटतो.
या कोशाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आपणास महत्त्वाचे समाजसुधारक व महत्त्वाच्या संस्था-संघटनांच्या कार्याचीही माहिती मिळते. मुद्यांच्या स्पष्टीकरणार्थ अद्ययावत आकडेवारी व तक्तेही येथे दिले आहेत.
मराठीतील सामाजिक शास्त्रांवरील ग्रंथांमध्ये या कोशाने मोलाची भर घातली आहे, असे खात्रीने वाटते.