दूर संवेदन हे भूप्रदेशाच्या सर्वेक्षणाचे एक प्रभावी आणि अचूक तंत्रज्ञान आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांची, पर्यावरणीय समस्यांची नेमकी कल्पना देण्याची या तंत्राची कुवत आश्चर्यकारक अशीच आहे. आज उपग्रहांच्या साहाय्याने सगळ्या पृथ्वीचे क्षण न् क्षण चित्रण चालू आहे व त्यातून भरपूर माहितीचे संकलन
होत आहे. सर्व तर्हेच्या विकास योजना, मृदा, शेती, वने, भूजल, वस्त्या यांचे नियोजन, राष्ट्रीय मानचित्रण, पूरनियंत्रण, विपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात हवाई छायाचित्रांचा उपयोगही सतत वाढतो आहे.
या प्रगत तंत्रज्ञानाची शास्त्रीय बैठक मराठीतून स्पष्ट करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.
दूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणार्या विविध विद्याशाखातील अभ्यासूंना या पुस्तकाचा निश्चितपणे
उपयोग होईल याची खात्री आहे.