एकोणिसाव्या शतकात व्यक्तिस्वातंत्र्य , सामाजिक धार्मिक बंधानांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य वाद या पाश्चात्य विचारांची ओळख भारतीय समाजाला झाली. त्यानंतर भारतीय व विशेषत: महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी स्त्री व शुद्रांच्या हक्कांसाठी जवळजवळ शतकभर कार्य केले. त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकात मुख्यत: वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर , लोकहितवादी , महात्मा फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्वपूर्ण ठरते.
प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल.