हॅन्स अँडरसन च्या परीकथा
हॅन्स अँडरसन च्या परीकथा
  • Load image into Gallery viewer, हॅन्स अँडरसन च्या परीकथा
  • Load image into Gallery viewer, हॅन्स अँडरसन च्या परीकथा

हॅन्स अँडरसन च्या परीकथा

Regular price
Rs. 195.00
Sale price
Rs. 195.00
Regular price
Rs. 250.00
Sold out
Unit price
per 

हंस बनलेल्या राजपुत्रांनी ते जाळं आपल्या चोचींमध्ये उचलून घेतलं. आपले विशाल पंख पसरून ते झेपावले. आपल्या बहिणीला घेऊन उंच ढगांपार गेले. एलिझाने भोवती पाहिलं. जमिनीपासून खूप खूप उंचावर होती ती! तिने मावळतीला आलेल्या सूर्याकडे श्वास रोखून पाहिलं.. तेवढ्यात ते हंस इतक्या झर्रकन खाली आले की, तिला वाटलं आता आपण पडणार! पण आता थोड्याच अंतरावर मुक्कामाचा तो खडक दिसू लागला होता.

खूप खूप वर्षांपूर्वी हॅन्स ख्रिश्चन अँडरसन नावाच्या परीकथाकाराने मुलांसाठी गोष्टींचं एक अद्भुत जग तयार केलं. या जगामध्ये स्वप्नांच्या दुनियेत रमणारी छोटी जलपरी मरमेड होती, आपल्या काळ्याकरड्या रूपामुळे दु:खी झालेलं बदकाचं छोटं पिलू होतं, हंस बनलेल्या आपल्या भावांना शापातून सोडवणारी शूर राजकन्या होती, कुणालाच न दिसणारं कापड विणणारे अजब विणकर होते, रात्र होताच जागं होणारं खेळण्यांचं जग होतं आणि चक्क शेकोटीच्या प्रेमात पडणारा स्नो मॅनसुद्धा होता! इतकी वर्षं झाली, पण या परीकथांमधली जादू ओसरलेली नाही. हॅन्स अँडरसनचं नवलाइने भरलेलं हे जग आम्ही नव्याने तुमच्या भेटीला घेऊन आलोय. त्याच्या जादूच्या पोतडीची मूठ पुन्हा एकदा उघडली आहे. पाहायचं का हळूच आत डोकावून? करायची का सैर या अद्भुत परीकथांच्या भन्नाट जगाची?