आठशे वर्षांच्या प्रदीर्घ काळनिद्रेनंतर, राष्ट्रक सम्राट कालधर पुन्हा जिवंत झाला आहे. महाकापालिक रुद्रकेशीच्या तांत्रिक शक्तींच्या बळावर त्याला पृथ्वीचा सम्राट व्हायचं आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षेला गंधर्वयोद्धा कालक आणि गरुडयोद्धा वैनतेय यांचा अडसर आडवा येतोय. अंधारवनातील शुभ्र देवतेनं कालकला आपल्या ताब्यात ठेवलंय आणि भविष्यातून भूतकाळात येणाऱ्या, वैनतेयचा जन्म व्हायला अजून तीन हजार वर्षांचा कालावधी बाकी आहे. तर्कशक्ती आणि कल्पनेच्या पलीकडच्या या रहस्यमयी, अनाकलनिय जगांत, सर्प आणि गरुडांचा, त्यांच्या अस्तित्त्वासाठीचा तीव्र संघर्ष सुरू झालाय. ‘महान संकटा’च्या पार्श्वभूमिवर एक अतिव भयंकर युद्ध लढलं जाणार आहे, ज्यांत मानव, सर्प, गरुड, यक्ष, पाताळी, गंधर्व, मृतात्मे, सिद्ध, आसरा, तृतीयपंथी, गण, कापालिक, वनदेवता अशा सर्वांचा समावेश आहे. मृतात्म्यांचा राजा कालधर आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल की वज्रप्रियेच्या मदतीने, विश्वाचा संहार होण्यापासून वाचवण्यात, भविष्ययोद्धा वैनतेय यशस्वी होईल?
सर्प-गरुड-मानव यांच्यातील प्राचीन संघर्षाची ही अद्भूत कथा वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते. प्रतिक पुरी यांच्या लेखणीतून साकारलेली, ‘मराठीतील पहिला अतिनायकः वैनतेय’ याची ही साहसयात्रा लहानथोर प्रत्येकाने अनुभवावी अशीच आहे.