दैनंदिन व्यवहारात, व्यवसायाच्या निमित्ताने असो किंवा इतर कुठल्याही कारणासाठी असो, संभाषण किंवा संवाद साधावाच लागतो. त्याशिवाय कुठलेही व्यवहार होऊच शकत नाहीत आणि हे व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोकरी, व्यवसायात यश मिळविण्यासाठी संभाषणकौशल्य जाणून घेणे आणि आत्मसात करणे ही आजची गरज बनली आहे. यातूनच स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रक्रिया होते. आपली नोकरी, व्यवसाय, दैनंदिन व्यवहार याकडे गांभीर्याने पाहिले जाते.