Katarwel
Katarwel
  • Load image into Gallery viewer, Katarwel
  • Load image into Gallery viewer, Katarwel

कातरवेळ

Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 150.00
Sold out
Unit price
per 

एखाद दुसर्‍या दिवसाच्या वास्तव्याकरता जमवून ठेवलेल्या वस्तू आणि बंद ठेवण्यासाठीच बांधलेलं ते घर बघून माझ्या मनात निष्कारण कालवाकालव झाली ! मागच्या पडवीचं दार बंद होतं. ते उघडलं की निश्चितच मागच्या परसात विहीर असेल. कदाचित अळूची नाहीतर केळीची झाडं असतील . कदाचित नसतीलही ! बहुदा नसतीलच .

सकाळी दरवाजा उघडला असता तरी चाललं असतं. पण मी अनाहूतपणे दारापर्यंत चालत गेलो . दाराचा कोयंडा काढला आणि बाहेरच्या भणभणत्या वार्‍यानं मी उघडू पाहत होतो ते दार जोरानं माझ्याच अंगावर ढकललं ! त्या वार्‍यानं माझ्या हातातल्या कंदीलाची वात विझली आणि ती पडवी आणि ते घर अंधारानं गपकन गिळून टाकलं !

क्षणभर मी तसाच थबकून , हबकून , किंचितसा घाबरून गेलो . त्या तेव्हड्या वेळात माझ्या नजरेला अंधाराची ओळख झाली . बाहेरच्या झिमझिमत्या प्रकाशात दिसणारा परिसर मी चाचपू लागलो . मला एकाएकी जाणवलं ते गूढ अस्तित्व आणि उंचच उंच माडांच्या रांगातून वाट काढीत येणारा समुद्राचा आसमंत पछाडून टाकणारा आर्त स्वर -----------!