लोकसंख्याशास्त्र
लोकसंख्याशास्त्र
  • Load image into Gallery viewer, लोकसंख्याशास्त्र
  • Load image into Gallery viewer, लोकसंख्याशास्त्र

लोकसंख्याशास्त्र

Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 160.00
Regular price
Rs. 200.00
Sold out
Unit price
per 

शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्याशास्त्र या विषयाच्या विविध संकल्पनांच्या व्याख्या आणि अर्थ यांचे सदर पुस्तकात विवेचन केले आहे. तसेच या विषयाचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रस्तुत विषयाशी संबंधित अभिजात व नव-अभिजात विचारवंतांनी मांडलेले सिद्धान्त, विचार आणि त्यांच्या मर्यादा यांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.

लोकसंख्येची रचना व विभागणी यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती या पुस्तकात दिली आहे. विशेषतः जनन, मर्त्यता यांच्यातील कल (trends) यांबाबत जागतिक व भारतीय संदर्भातील सांख्यिकीय माहिती, तक्ते व आलेख-आकृत्यांद्वारे मांडली आहे. लोकसंख्येची लिंग संरचना, वयोगटानुसार रचना, व्यवसायानुसार विभागणी, भाषावार व धर्मानुसार विभागणी इ.ची सांख्यिकीय माहिती तक्त्यांद्वारे देऊन विश्लेषण केले आहे.

लोकसंख्या आणि विविध सामाजिक प्रवाह यांची चर्चा करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून उपयोग करून स्थलांतर, नागरीकरण, पर्यावरण, लोकसंख्या धोरण, मत व बालकल्याण धोरण इ.ची माहिती अंतर्भूत केली आहे. लोकसंख्या विषयातील आधुनिक प्रवाह उदा. लोकसंख्या त्रिमितीस्तंभ (Pyramid), लोकसंख्या प्रक्षेपण पद्धती (projection) इ.चाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

समाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'लोकसंख्याशास्त्र' अथवा 'लोकसंख्या शिक्षण' या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एम.फील., पी.एचडी. व प्रगत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठीदेखील हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे.