महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतीक म्हणजे तुकाराम आणि रामदास हे संतद्वय. या समकालीन संतांच्या वाङ्मयाचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न आज इतक्या वर्षांनंतरही अजून जोमाने सुरू आहेत. दै. लोकसत्ताने २०१६ साली या दोन संतांच्या कार्याचा, आयुष्याचा आणि अर्थातच वाङ्मयाचा वेध घेण्याचा प्रयत्न असाच दोन सदरांच्या माध्यमांतून केला. त्यास उदंड प्रतिसाद लाभला. ही पुण्याई अर्थातच या दोन संतांची. या दोघांतील अद्वैत असेच वर्तमानपत्राच्या दैनंदिनतेच्या पलीकडेही टिकून रहावे, याच उद्देशाने त्यास ग्रंथरूप दिले जात आहे. तुका‘राम’दास या त्याच्या प्रतीकातून.