मराठ्यांच्या राजकीय इतिहासाची चौकट आता सगळ्यांनाच साधारण माहीत झाली आहे. परंतु मध्ययुगीन मराठ्यांचे सामाजिक जीवन आणि त्यांचा आर्थिक विकास यावर म्हणावे तितके लक्ष दिले गेलेले नाही. प्रस्तुत ग्रंथात मध्ययुगीन महाराष्ट्राच्या समाजिक आर्थिक जीवनाच्या आणि त्या आनुषंगिक विषयांचा परिचय काही शोध निबंधांच्या द्वारे करून देण्याचा प्रयत्न केला आहे.