प्रस्तुत ग्रंथात, इतिहासाचे सर्व थरांतील विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसाधारण इतिहासप्रेमी वाचक यांच्या माहितीसाठी माझ्या काही शोधनिबंधांचे- विशेषतः इंग्रजीत निरनिराळ्या परिषदांतून सादर केलेले- मराठी रूपांतर सादर केले आहेत. ‘शिवकालीन महाराष्ट्र : सामाजिक आणि आर्थिक जीवन’ हा माझ्या अभ्यासाचा प्रमुख विषय असला तरी त्याच्या अनुषंगाने आणि शिकविण्याच्या दृष्टीने मला जो अन्य विषयांचा अभ्यास करावा लागला, त्या विषयावर कारणपरत्वे मी जे लेखन केले, त्याचे संकलन प्रस्तुत ग्रथांत केले आहे. त्यामुळे यात वारकरी संप्रदायाच्या काळापासून समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचणार्या महात्मा जोतीराव फुले यांच्या कालखंडापर्यंत विविध विषय आलेले आहेत. विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि इतिहासप्रेमी वाचक यांना त्यापासून काही माहिती मिळेल, अशी उमेद आहे.