उत्तर आणि दक्षिण भारतातील स्थापत्यशैलींचा संगम घडवून ‘भूमिज’ स्थापत्य शैलीचा उगम झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली भूमिज स्थापत्यशैली उत्तर भारतातील नागर शैलीच्या अधिक जवळ जाणारी आहे. गावोगाव विखुरलेल्या अक्षरश: शेकडो मंदिरांनी आपल्या समग्र जीवनावर एकेकाळी लक्षणीय प्रभाव पाडला. त्यांपैकी किमान २००-२५० मंदिरे आज भग्नावस्थेत इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.
‘मंदिर’ केवळ धार्मिक उपयोगाचे स्थान नसून आर्थिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक घडामोडींचेही ते महत्त्वपूर्ण केंद्र होते. कला, स्थापत्य आणि भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन मंदिर- स्थापत्यातून होते. त्याचाच परामर्श घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे.
Marathi book on Architecture of Temples in Maharashtra by Dr. Bhagyashree Kale-Patskar.