
आंबेडकरी राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा घटक आहे. पाच प्रमुख पक्षात विभागलेल्या राजकारणात सत्ता संतुलन करण्याची क्षमता या राजकारणात आहे, आंबेडकरी राजकीय शक्ति महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांच्यात विभागली आहे. या शक्तीचा उदय आणि विकास व त्याचे स्वरूप याचा अभ्यास या पुस्तकात केला आहे .