कोणतेही चलन ही तत्कालीन अर्थव्यवस्थेची नाडी असते. सध्याचे चलन हाताळताना या चलनाच्या इतिहासाबाबत आपोआप उत्सुकता निर्माण होते. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला, लेणी, किल्ले या परंपरांप्रमाणे चलनाची, नाण्यांची मोठी परंपरा आहे.
आधुनिकपूर्व महाराष्ट्रातील चलनाला, नाण्यांना केंद्रस्थानी ठेऊन, इतिहासाच्या साक्षीने मांडलेला हा एक छोटा अभ्यास आहे. आधुनिक चलनाचा पाया म्हणून, मराठा चलन व ब्रिटिश चलन यांच्यातील सातत्य बदलाचा हा एक मनोरंजक व माहितीपूर्ण असा वेध आहे.