क्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात खेळल्या जाणार्या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे.