प्रसारमाध्यमे हा शब्द सध्या सतत ऐकू येत असतो, पण त्याचा नेमका अर्थ, स्वरूप, दिशा आदी गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नसतात. म्हणूनच आवर्जून या विषयावर सोप्या भाषेत, सर्वांगीण विचार करून लिहिलेले हे पुस्तक.
मिडिया मुद्रित असो अगर दुक्श्राव्य. महाराष्ट्रातल्या मिडियाने प्रारंभी ऊब देणार्या आणि प्रकाश पसरवणार्या सहकार्याची भूमिका बजावली असली तर आज मात्र मिडियाचा वापर नेमका कसा होतो आहे याबाबत बरेचजण साशंक आणि भयग्रस्त आहेत. अपेक्षा आहे की प्रसारमाध्यमांनी ज्ञानाची आणि प्रबोधनाची ज्योत लावावी आणि प्रसन्नतेचा प्रकाश पसरावा.