उद्योजक व्हायची स्वप्ने अनेक तरुण पाहत असतात. यश म्हणजे काही अपघात नाही. तरुणांना सांगावेसे वाटते की यशस्वी माणसांच्या चरित्रांचा बारकाईने अभ्यास करा. त्यांच्यातले चांगले गुण आत्मसात करा. अशा काही मोजक्या यशस्वी उद्योजकांची प्रेरणादायी चरित्रे या पुस्तकात मंडळी आहेत. त्यांच्यातील सगुणांचे विश्लेषण करून तरुण होतकरू उद्योजकांचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.