महाराष्ट्राची पवित्रभूमी ही येथील संतमहात्म्यांमुळे जशी अधिक पावन झाली तशीच महाराष्ट्रातील सरस्वतीपुत्रांच्या वाग्विलासामुळे अधिकच चैतन्यमय झाली. महाराष्ट्रातील या सरस्वतीपुत्रांच्या आशीर्वादाने अनेक वाक्पटू महाराष्ट्राला लाभले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक व्यासपीठे त्यांनी गाजवली. त्या बॅ. नाथ पै. श्री. म. माटे, सेतू महादेवराव पगडी, पु. ल. देशपांडे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसार‘या दिग्गज वक्त्यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकांना व्हावा या उद्देशाने झालेली ग‘ंथनिर्मिती म्हणजे ‘महाराष्ट्रातील वक्ते.’