अलंकार ! मानवाच्या सृजनशीलतेचा मनोरम आविष्कार. निरनिराळ्या गोष्टींपासून स्वत:चे सौंदर्य खुलविण्यासाठी तसेच शरीराच्या हात, पाय, गळा, नाक, कान अशा अवयवांसाठी विविध कलाकृती मानवाने तयार केल्या. यात हिरे, माणके, रत्ने, मोती, पाचू, खडे यांचा इतका सुंदर वापर केला आहे की त्यावरून नजर हलू नये. दागिन्यांबद्दल स्त्रीच्या मनात आकर्षणाचा एक नाजूक, हळवा कोपरा असतो. तसेच पुरुषाच्या मनात त्याबद्दल अभिमानाची भावना असते. कलाकुसर, सौंदर्य याबरोबरच मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या दागिन्यांबद्दलचा समावेशक आणि मनोरंजक माहितीचा खजिनाच हे पुस्तक वाचकांपुढे खुला करत आहे. पुस्तक उघडा आणि त्या खजिन्याचा आनंद लुटा |