१९६० ते २००९ पर्यंतच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील महिलांच्या राजकीय सहभागाचे विश्लेषण ‘महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख’ या पुस्तकात केले आहे.
राजकीय समावेशन (Political Inclusion), राजकीय वगळण्याची प्रक्रिया (Political Exclusion), लिंगभाव व पितृसत्ताकता (Gender and Patriarchy) या संकल्पनात्मक चौकटींमध्ये महिलांच्या राजकीय सहभागाचे चिकित्सक विश्लेषण या ठिकाणी केलेले आहे.
हे पुस्तक समावेशन व वगळण्याची प्रक्रिया धोरणनिर्मिती विभाग (Political Inclusion and Exclusion Department), स्त्री अभ्यास केंद्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विभाग यांना उपयुक्त ठरणारे आहे.
‘महिला सक्षमीकरण धोरण’ हे आधुनिक उदारमतवादाचा विकास व विस्तार करणारे धोरण कसे आहे याचेही सविस्तर विवेचन या पुस्तकाद्वारे केले गेले आहे.
रमाबाई रानडे व शारदाबाई पवार यांनी कौटुंबिक चौकट मोडीत न काढता सार्वजनिक व व्यक्तिगत जीवनामध्ये उदारमतवादाचा वापर कसा केला, याचे स्पष्टीकरण येथे केले आहे.
त्याचप्रमाणे स्थानिक व राज्य पातळीवरील सत्तेमध्ये महिलांना किती प्रमाणात वाटा मिळाला याचेही संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे अभ्यासपूर्वक विश्लेषण केलेले आहे.