स्त्री भ्रूण हत्या आणि त्यामुळे स्त्रियांच्या संख्येत होणारी घट रोखायला हवी.
हुंड्याचा धोंडा डोक्यावरून उतरायला हवा. विनाकारण होणारा अत्याचार थांबायला हवा. तिच्या शरीरावर तिचाच हक्क - त्यावरची बळजबरी का खपवून घ्यायची?
स्त्रियांनाही माणूस म्हणून सन्मानाने जगता यायला हवं. त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यासाठी काय करायला हवं हे साध्या, सरळ, सोप्या भाषेत समजून देण्यासाठीचा हा प्रयत्न. या बाबतीत कायद्याची काय मदत मिळू शकते याची माहिती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल अशी आशा वाटते.