मराठेकालीन शौर्यकथा
मराठेकालीन शौर्यकथा
  • Load image into Gallery viewer, मराठेकालीन शौर्यकथा
  • Load image into Gallery viewer, मराठेकालीन शौर्यकथा

मराठेकालीन शौर्यकथा

Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 150.00
Sold out
Unit price
per 

संपूर्ण भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाचे स्थान काही आगळेच आहे. थोर विचारवंत प्रा. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे म्हणतात, ‘‘मराठ्यांनी हिंदुस्थान बांधला.’’ थोडक्यात मराठ्यांचा इतिहास हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रापुरते न पाहता संपूर्ण हिंदुस्थान आणि त्याचे स्वातंत्र्य आपल्या डोळ्यांसमोर ठेवले. मराठे महाराष्ट्राच्या बाहेर पडले, संकुचित दृष्टी न ठेवता विशाल दृष्टी बाळगून अहद कावेरी तहद दिल्ली, अटक ते कटक सर्वदूर ते पसरले. भारतीय स्वातंत्र्यासाठी ते धावून गेले. कविवर्य प्रा. वसंत बापट यांच्या शब्दांत
‘अन्याय घडो शेजारी | की दुनियेच्या बाजारी|
धावून तिथेही जाऊ| स्वातंत्र्यमंत्र हा गाऊ|
मर्दूनी शत्रु उद्दंड | नवा इतिहास पुन्हा घडवू॥
ध्वज उंच उंच चढवू॥
तर अशा या महान स्वातंत्र्यप्रयत्नात लाखभर मराठे धारातीर्थी पडलेले आहेत. मोठाच त्याग आहे हा ! तर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांपासून थेट
देवी श्री अहल्याबाई होळकर ह्या कालखंडातील काही तेजस्वी कथांचा हा संग्रह, स्त्री-पुरुष, लहान थोर, साक्षर-सुशिक्षित सर्वांनाच अतिशय आवडेल. आपण अवश्य वाचावे, आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक...