इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या अट्टाहासातून भाषा शिक्षणाचा दर्ज खालवला जाऊन इंग्रजी-मराठीच्या विचित्र मिश्रणाने मराठी संस्कृतीवर ही परिणाम होतो आहे. शुद्धलेखनाच्या होणाऱ्या घसारणीचा मराठी भाषेवर होणारा परिणाम आज एकविसाव्या शतकातील जागतिकीकरणाच्या काळात चिंतेचा विषय झाला आहे. या संदर्भात सत्वशील सामंत यांच्या भाषा यांनी शुद्धलेखन विषयक भूमिकेची सुस्पष्ट मांडणी करणारे लेख मराठी भाषकांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतील.