या ग्रंथात मराठी कादंबरीचा उगम या सांस्कृतिक वस्तुस्थितीची अपूर्णमित संकल्पनेच्या आधारे मीमांसा केली आहे. तसंच तिचं प्रारंभीच्या काळातलं रूप समजून घेण्याचं आव्हान एकोणिसाव्या शतकातल्या लुप्तप्राय झालेल्या १३५ कादंबर्यांच्या साहाय्याने पेललं आहे. एकोणिसाव्या शतकातल्या सुशिक्षितांप्रमाणेच तत्कालीन कादंबरीही साम्राज्यवादी आणि राष्ट्रवादी या दोन विरोधी भूमिकांमध्ये आंदोलत होती. प्रस्तुत ग्रंथात या दोन विरोधी भूमिकांना अनुसरून पुढे आलेल्या तिच्या रूपाचं वस्तुनिष्ठपणे आणि अनेक बारकाव्यांसह विवेचन केलं आहे. त्यामुळे हे विवेचन साहित्याच्या अभ्यासाला नक्कीच नवी दिशा देईल. एक ऐतिहासिक भाष्य आणि दुर्मीळ दस्तऐवज म्हणून या ग्रंथाचं महत्त्व आहेच, पण सध्याच्या काळातल्या साहित्याच्या संशोधकांसाठीसुद्धा हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे.