लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे वृत्तपत्रसृष्टी. इंग्लंडभूमीत उदय पावलेली लोकशाही भारतात चांगल्या प्रकारे रुजली असे म्हणता येईल. लोकशाही रुजण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेची जागृतता. वृत्तपत्र हा जागृत पहारेकरी आहे. वृत्तपत्रातून घडणारी लेखणीची करामत ही लोकशाहीची प्रचंड ताकद उभी करू शकते ही वस्तुस्थिती आहे.
या प्रभावशाली माध्यमाची सुरुवात ज्यांनी केली, ज्यांनी हा मार्ग खोदला, त्याचा आज विशाल राजमार्ग झाला आहे. अशा वर्तमानपत्रसृष्टीच्या प्रारंभाच्या वाटचालीचा हा उद्बोधक व मनोरंजक आढावा.