मार्टिन लुथर किंग
मार्टिन लुथर किंग
  • Load image into Gallery viewer, मार्टिन लुथर किंग
  • Load image into Gallery viewer, मार्टिन लुथर किंग

मार्टिन लुथर किंग

Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 150.00
Sold out
Unit price
per 

वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘निग्रो आणि संविधान’ हा विषय मार्टिनने निवडला होता आणि स्पर्धेत पहिलं बक्षीस पटकावलं होतं. स्पर्धेहून घरी जाताना मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला बसमध्ये बसायला लगेच जागा मिळाली, पण गोर्या प्रवाशांनी बस हळूहळू तुडुंब भरली. पुढच्या थांब्यावर दोन गोरे प्रवासी चढल्यावर त्यांना बसायला जागा नसल्याने कृष्णवर्णीय असलेल्या मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला चालकाने अतिशय उद्धटपणे जागेवरून उठायला सांगितलं. दोघं खूप दमले असल्याने आणि दोघांनीही आधी चढून जागा मिळवल्या असल्याने चालकाचं न ऐकता ते तसेच बसून राहिले. मग चालकाने भडकून त्यांना शिव्या घालायला सुरुवात केली. अखेरीस, त्यांना त्या जागेवरून उठावंच लागलं !

मार्टिनचं संपूर्ण आयुष्य अशा अनेक कडवट प्रसंगांनी भरलेलं होतं; पण त्यामुळे मार्टिन खचला नाही. माणसाच्या रंगावरून त्याचं माणूसपण जोखणार्या व्यवस्थेशी तो शेवटच्या श्वासापर्यंत लढला. त्याच्या प्रखर, पण अहिंसक लढ्याची ताकद सगळ्या जगाने अनुभवली.

म्हणूनच मार्टिन लुथर किंग आणि त्याचा ध्येयवेडेपणा आजही प्रेरणा देत राहतात !