प्रत्येक व्यक्तीच्या ठायी वेगवेगळे गुण कमी-अधिक प्रमाणात असतात. तसेच जन्मापासून प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते व जेथे सहज यश मिळणार असते तेथे त्यांना अपयश प्राप्त होते. कारण काहीजण आपल्या विकसित कौशल्यांचा योग्य प्रकारे वापर करतात, तर काहीजण तसे करू शकत नाहीत.
या पुस्तकात यश मिळण्यासाठीचे काही मार्ग सुचविले आहेत. तरुणवर्ग, व्यावसायिक, शिक्षक व पालक या सर्वांना यांचा उपयोग नक्कीच होईल.
प्रत्येकजण आजही यशाची व्याख्या बनवितो व त्यानुसार आपला मार्ग ठरवतो. अशा मार्गस्थांना हा ग्रंथ मार्गदर्शन करणारा ठरेल यात शंका नाही.