‘मिशन भारत’ ही राजकीय घटनांवर आधारित थरारक कादंबरी आहे. भारताचा भाग असलेला काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानची दहशतवादी धडपड, भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, सतत घडवून आणले जाणारे बॉम्बस्फोट्स आणि त्यामुळे भारताच्या राजकीय पटलावर आणि लष्करी तसेच गुप्तहेर संघटनेवर निर्माण झालेला ताण हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.
‘धर्म’ या भावनेच्या आधारे विध्वंसक कामासाठी तरुणांचा होणारा दुरुपयोग, या विध्वंसक दहशतवादी कारवायांमुळे बळी जाणारी सामान्य जनता आणि या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय गुप्तहेर संघटनेचे चालणारे अहोरात्र प्रयत्न, तसेच त्या अनुषंगाने राजकीय, आर्थिक आणि धार्मिक स्तरावर चालणारी उलथापालथ हे सर्व काल्पनिकरीत्या या कादंबरीतून वेगाने उलगडत जाते.