‘कनिष्ठांशी मुजोरी आणि वरिष्ठांशी लाचारी’ दाखवणारे संपादक मराठी पत्रकारितेत अनेक आहेत. हल्ली तर तो संपादकांचा ट्रेडमार्कच झाला आहे. पण याला निखिल वागळे सणसणीत अपवाद आहेत. ते लोकप्रिय पत्रकार आहेत, पण लोकानुनयी नाहीत. ते स्वच्छतावादी आहेत, पण तुच्छतावादी नाहीत.
...तर अशा या वागळे यांचं हे नवं पुस्तक. २५ जानेवारी २०१८ ते ६ जून २०१९ या कालावधीत वागळे यांनी ‘अक्षरनामा’ या फीचर्स पोर्टलवर ‘सडेतोड’ हे साप्ताहिक सदर लिहिलं. त्याचं हे पुस्तकरूप. यात पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळातल्या प्रमुख राजकीय घडामोडींचा समाचार आहे. तसेच विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यावरही टीकालेख आहेत.
एका सडेतोड पत्रकाराचे हे रोकडे विश्लेषण आपल्याला अपप्रचारांच्या अनेक मायाजालांमधून ओढून काढून भानावर आणते!