‘वाचन’ आणि ‘श्रवण’ हे ज्ञान संपादनाचे दोन महत्त्वाचे मार्ग. मुले लहान असताना स्वतः वाचू शकत नाहीत परंतु ते ऐकू शकतात. किंबहुना त्यांची या काळातली श्रवणशक्ती व ग्रहणशक्ती अतिशय तल्लख असते. अगदी लहानपणापासून मुलांना वाचून दाखवल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात मौलिक भर पडते. मुलांना वाचनाची गोडी लागते. त्यांच्या शब्दसामर्थ्यात विलक्षण वाढ होते. त्यांच्यातील आकलनक्षमता, सर्जनशीलता विकसित होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनकौशल्याचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
मुलांचे वाचनकौशल्य विकसित करण्याचे समग्र तंत्र, त्यामागचे शास्त्रीय संशोधन यांविषयी पालकांना, शिक्षकांना सहजसोप्या शब्दात ओळख हे पुस्तक करून देते. या प्रक्रियेतील पालकांच्या विशेषतः वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देते. हे जगभरात गाजलेले पुस्तक प्रत्येक मराठी पालकाने, शिक्षकाने वाचलेच पाहिजे.