नवोदित लेखक् राजन बिचे यांची नवीन सामाजिक कादंबरी.
राजन बिचे :
"खासगी कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त. १९७९ पासून विविध वृत्तपत्रांतून लेखन. सकाळ, केसरी, तरुणभारत, प्रभात यांतून लेख प्रसिद्ध तसेच पत्रलेखक म्हणून आजवर ६५० पेक्षा अधिक पत्रे प्रसिद्ध आहेत व होत आहेत.
‘समाजसेवक’ म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव तसेच समाजसेवी संस्थांबरोबर काम करण्याची संधी. विविध पदे भूषवून सामाजिक कार्यात अग्रेसर. विविध विषयांवरील १५० पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन तसेच सामाजिक कार्यातील समारंभाचे आयोजन व वकृत्व यामुळे परिचित.
‘कोरोना’काळातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार."