रूढ अर्थाने हे नाना फडणिसांचे चरित्र नाही. पानिपतच्या धामधुमीतून केवळ दैवयोगाने देशी सुखरूप परत आलेल्या नाना फडणिसांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि कार्यकुशलतेने मराठी राज्याची घडी कशी बसविली? विशेषत: थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर अराजक सदृश्य परिस्थितीत, फुटीर सरंजामी सरदारांना लगामी राखून त्यांना पेशव्यांचे सार्वभौमत्व कसे मान्य करावयास लावले? देशी-विदेशी शत्रुंच्या महत्त्वाकांक्षेला कसा लगाम घातला? बारभाई प्रयोग राबविताना नाना कुठे कमी पडले? सातारकर छत्रपती, पेशवे यांच्याशी त्यांचा राजकीय व्यवहार कसा राहिला, या सार्यांचे अस्सल - प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांच्या आधारे केलेले ‘नाना फडणीस’ या पुस्तकातील विवेचन बोधप्रद वाटेल, असा विश्वास वाटतो.