नयी तालीम
नयी तालीम
  • Load image into Gallery viewer, नयी तालीम
  • Load image into Gallery viewer, नयी तालीम

नयी तालीम

Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 440.00
Regular price
Rs. 550.00
Sold out
Unit price
per 

नयी तालीम शिक्षणाला हेतूपूर्ण अंग होते ते नवसमाजरचनेच्या निर्मितीचे शोषणविहीन आणि समतेवर नि न्याय्यतेवर आधारित असा खरा लोकशाही समाज गांधीजींना अभिप्रेत होता. उच्च-नीच भाव नसलेला, शहरे आणि खेडी यांमधील अंतर नाहीसे करणारा, बुद्धीचे काम आणि श्रमाचे काम यांमध्ये फारकत न करणारा, शिक्षित आणि अडाणी समाजात पडलेले अंतर भरून काढणारा, जन्मापेक्षा कर्मावर भर देण्याची मानसिकता असलेला, जेथे प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार मिळते आहे, पण त्याचबरोबर, आपल्यासारख्या दुसर्‍याला जे मिळणार नाही ते आपलेही असणार नाही, अशी मानसिकता तयार झालेला आणि परस्परांमध्ये धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद, वर्गभेद अशा समाज मोडणार्‍या वृत्तींच्या वर उठणारा नि बंधुभावाने परस्परव्यवहार साधणारा असा समाज अपेक्षित होता.

गांधीजींच्या मते, नयी तालीमचे शिक्षण हे आजच्या समाजाला या ध्येयाकडे पावले टाकायला लावणारे, शिक्षण असणार होते. गांधीजींनी म्हटले होते, की प्राथमिक शिक्षण प्रदान करण्याची योजना ही फार दूरवरचे परिणाम अनुस्युत असलेल्या अशा एका शांतिपूर्ण क्रांतीकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे.