Our Kind Of Traitor

आवर काइंड ऑफ ट्रेटर

Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 280.00
Regular price
Rs. 350.00
Sold out
Unit price
per 

आवर काइंड ट्रेटर ही जॉन ले कारे यांच्या रहस्यमय कादंबर्यांच्या शृंखलेतील बाविसावी कादंबरी. थरारनाट्याची एक अद्भुत अनुभूती !

पेरी आणि गेल हे प्रेमी जोडपं, कॅरीबियनमध्ये सुटी घालवायला येतं आणि तिथे त्यांना भेटतो, दिमा नामक एक रशियन अब्जाधीश. तिथून सुरू होतो त्यांचा विलक्षण थरकाप उडवणारा, भयचकित करणारा प्रवास. दिमा, काळ्या दूनियेचा बादशहा ! गूढ आणि भेदरलेला. त्याला आशा आहे, केवळ पेरीच त्याला वाचवू शकतो.

ब्रिटिश गुप्तहेर संघटनेचे सदस्य, पेरी व गेलची कसून चौकशी करत आहेत. सारे सरकारी कायदे धाब्यावर बसवून त्यांची खलबतं सुरू आहेत. ब्रिटिश सरकारचा प्रचंड पैसा पणाला लागलेला आहे व त्यावर पाणी सोडणं सरकारला परवडणारं नाही. मग अशा वेळी एक-दोघांच्या आयुष्याचा बळी क्रमप्राप्त ठरतो.

देशोदेशी खोलवर रुतलेला काळ्या पैशांचा व्यापार, तस्करी, भ्रष्टाचार, हिंसा, राजकीय कुरघोडी यांचं मर्मभेदी चित्रण एकीकडे वाचकाला खिळवून ठेवतं; तर दूसरीकडे आरपार हादरवून सोडतं.

हेच या कादंबरीच्या भरघोस यशाचं गमक आहे.